5 Dec 2022, 07:23 वाजता
गोवरबाबत टास्क फोर्स आज करणार अॅक्शन प्लॅन
Maharashta Measles Outbreak | Marathi News LIVE : राज्यभरात गोवरचा फैलाव झालाय. गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सची आज बैठक (Task Force Meeting) बोलावण्यात आलीय. या बैठकीत खासगी वैद्यकीय यंत्रणांचाही सहभाग असेल. गोवरचा (Govar) मोठ्या प्रमाणात फैलाव झालेले जिल्हे, कुपोषण अधिक असलेले भाग, लसवंचित बालकं या प्रमुख मुद्द्यांचा विचार करून अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. राज्यात गोवरमुळे आतापर्यंत 18 मुलांचा मृत्यू झालाय तर रुग्णांची संख्या 823वर पोहोचलीय. तर संशयित रूग्णांची संख्या 12 हजारावर गेलीय. राज्यात यावर्षी एकूण 93 ठिकाणी गोवरचा उद्रेक झालाय. टास्क फोर्स आणि गोवर मृत्यू विश्लेषण समितीच्या निरिक्षणाप्रमाणे गोवरमुळे होणा-या मृत्यूंमध्ये कुपोषण आणि लसीकरणाचा अभाव ही प्रमुख कारणं आढळली आहेत. त्यामुळे गोवरमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी कुपोषित मुलांवर अधिक लक्ष दिलं जाणार आहे.