5 Dec 2022, 11:45 वाजता
मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?
Vasant More & Ajit Pawar | Marathi News LIVE : पुण्यातले मनसे नेते आणि राज ठाकरेंचे कट्टर समर्थक वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार का याची जोरदार चर्चा सुरु झालीय. कारण थेट अजित पवारांनीच (Ajit Pawar) वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिल्याचं समजतंय. पुण्यातल्या एका विवाहसोहळ्यात अजित पवारांसोबत वसंत मोरेंची (Vasant More) भेट झाली. तेव्हा तात्या कधी येताय, वाट पाहतोय या शब्दांत अजित पवारांनी वसंत मोरेंना खुली ऑफर दिल्याचं समजतंय. वसंत मोरे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्याचं मान्य केलंय. वसंत मोरे सध्या मनसेवर नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमी पाहा - 'तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना खुली ऑफर
5 Dec 2022, 11:18 वाजता
अमरावतीमध्ये 150 जणांना विषबाधा
Amravati Food Poison | Marathi News LIVE : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं 100 ते 150 नागरिकांना विषबाधा (Food Poison) झालीय. एका समारंभात जेवण केल्यानंतर विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. अचलपूरमधील प्रहार पक्षाचे माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम (Engagement Ceremony)आयोजित करण्यात आला होता. जेवणानंतर काही महिला, पुरुष आणि बालकांना अचानक मळमळ, उलट्या, ताप व अतिसार होऊ लागला. यामुळे शंभर ते दीडशे नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी अचानक एवढे रुग्ण भरती झाल्याने रुग्णालयात एकच तारांबळ उडाली होती. सध्या सर्व रुग्णांची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय.
बातमी पाहा - साखरपुड्याचे जेवण बेतलं असतं जीवावर; दीडशे पाहुण्यांना झाली विषबाधा
5 Dec 2022, 10:44 वाजता
संभाजीनगरमध्ये संतापजनक प्रकार, वृद्ध महिलेला नग्न करुन मारहाण
Sambhajinagar Crime News | Marathi News LIVE : संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी, नातवाने मुलगी पळवली म्हणून त्याच्या आजीला (Old Woman Beaten) विवस्त्र करुन मारहाण करण्यात आलीय. एवढंच नाही त्याचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आलाय बातमीचा व्हिडिओ पाहा. ओझर गावातली ही संतापजनक घटना आहे. विवेक उर्फ चवल्या पिंपळे याच्यासह दोघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. गंगापूर फाट्यावर ही महिला राहते. तीच्या नातवाने मुलीला पळवून आणलं असा आरोप करत सदर आरोपी घरी आला. आणि या वृद्ध महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बातमी पाहा - धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ
5 Dec 2022, 09:56 वाजता
गुजरातचा रणसंग्राम
Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरुय. दुस-या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान सुरु असून 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अहमदाबादमधल्या रानिपच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला पाहा बातमीचा व्हिडिओ. मोदींनी गुजरातवासियांना मतदानाचं आवाहन केलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि ‘आप’प्रमाणेच काही प्रादेशिक पक्षही स्वतःचं भवितव्य आजमावत आहेत. उत्तर आणि मध्य गुजरातमधील14 जिल्ह्यांत दुस-या टप्प्यातील मतदान पार पडतंय. यामध्ये अहमदाबाद, बडोदा आणि गांधीनगर आदी महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुस-या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि आणि अल्पेश ठाकोर यांच्या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 जागांसाठीचं पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरलाच पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी 63.31 टक्के मतदान झालं होतं.
बातमी पाहा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
5 Dec 2022, 09:06 वाजता
मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द
Maharashtra - Karnatak Border Dispute | Marathi News LIVE : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचा उद्याचा बेळगाव दौरा (Belgum Tour) रद्द केलाय...सीमावादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnatak Chief Minister Basavaraj Bommai) रोज कुरापती काढत असताना राज्य सरकारने माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय...सोलापुरातील अक्कलकोट, सांगलीतील जत गावांवर कर्नाटकने दावा केलाय...त्यामुळे कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी सीमा प्रश्नावर समन्वयासाठी मंत्री समितीचे चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई उद्या कर्नाटकात जाणार होते...पण, त्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावी अशी सूचना बोम्मईंनी केली होती...त्यामुळे राज्य सरकारने माघार घेतलीय...
बातमी पाहा - बोम्मई यांच्या इशारानंतर शिंदेंच्या मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द
5 Dec 2022, 08:59 वाजता
मुंबई फायर ब्रिगेडमध्ये लवकरच भरती
Mumbai News | Marathi News LIVE : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... कारण मुंबई फायर ब्रिगेडमध्ये (Jobs in Fire Brigade) आता मेगाभरती होणार आहे. लवकरच फायर ब्रिगेडच्या 910 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोलीस भरतीप्रमाणेच वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आलीय. खुल्या गटासाठी 25 ऐवजी 27 तर आरक्षणासाठी 30 ऐवजी 32 वर्षांची वयोमर्यादा असेल. बारावी उत्तीर्ण उमेदवारांची शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर भरती केली जाईल. पण प्रत्यक्ष रुजु होण्यास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
बातमी पाहा - अग्निशमन दलात नोकरीची मोठी संधी, पाहा कसा कराल अर्ज
5 Dec 2022, 08:43 वाजता
सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक
Mumbai News | Marathi News LIVE : मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) अडीच कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय...कस्टम विभागाने (Custom Department) ही मोठी कारवाई केलीय...दोन कारवाईत साडे चार किलोंचं सोनं जप्त (Gold Seized) केलंय...तस्करी करणा-यांनी अंडरगारमेंट्समध्ये 1872 ग्रॅम सोनं लपवून ठेवलं होतं...तर दुस-या कारवाई फ्लाईटमधील टॉयलेटमध्ये लपवून ठेवलं अडीच किलो सोनं हस्तगत केलंय...या कारवाईत 3 जणांना अटक केलीय...हे जप्त केलेलं सोनं कुठून आणलं...? कुठे घेऊन चालले होते याचा तपास सुरूये...
बातमी पाहा - बापरे! साडे चार किलो सोनं मुंबई विमानतळावर जप्त; कुठे ठेवलं होतं सोनं
5 Dec 2022, 08:26 वाजता
आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली! या तारखेला होणार भराडी देवीची जत्रा
Sindhudurga News | Marathi News LIVE : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या जत्रेची (Anganewadi Jatra) तारीख ठरलीय. यंदाचा भराडीदेवीचा जत्रोत्सव 4 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे...मालवणच्या आंगणे कुटुंबीयांनी या जत्रेची माहिती दिलीय.
बातमी पाहा - आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली! या तारखेला होणार भराडी देवीची जत्रा
5 Dec 2022, 08:08 वाजता
जुळ्या बहिणींशी लग्न नवरेदवाच्या अंगलट
Pandharpur Twin Marriage | Marathi News LIVE : सोलापुरमधील जुळ्या बहिणीनीं एकाच मुलाशी लग्न केलं. पण आता हे लग्न करणं नवरदेव अतुल आवतडेच्या अंगलट आलंय. अकलूज पोलीस स्टेशनमध्ये नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल झालाच आहे. पण आता महिला आयोगानेही कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन (Rupali Chakankar Tweet) ही माहिती दिलीय. सोलापूर पोलीस अधीक्षकांनाही यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अकलूज पोलीस स्टेशनमध्ये कालच नवरदेवाविरोधात आयपीसी कलम 494 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती किंवा पत्नी जिवंत असताना किंवा घटस्फोट न घेता पुनर्विवाह करणे हा IPC च्या कलम 494 अंतर्गत गुन्हा मानला जातो. यामध्ये गुन्हेगाराला 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
5 Dec 2022, 07:37 वाजता
गोवर लसीचा अतिरिक्त डोस आवश्यकच
Measles Vaccine | Marathi News LIVE : राज्यात गोवरनं उद्रेक केलाय. पण गोवरला आळा घालायचा असेल तर लस (Govar Vaccine) घेण्याचं आवाहन डॉक्टर्स करतायत. गोवरची लस देताना एक डोस दिल्यानंतर चार आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जातो. पण एखाद्या प्रकरणात पहिल्या डोसनंतर काहीच दिवसांत दुसरा डोस घेतल्यास त्याचा दुष्परिणाम होणार नाही.. असा दावा बालरोगतज्ज्ञांनी केलाय. तर लसींच्या वेळापत्रकानुसार बाळाला पोलिओची लस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला पोलिओची लस देता येते. तीच पद्धत सध्या गोवरच्या लसीकरणांसाठी वापरण्यात येत असल्याचं जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलंय.
बातमी पाहा - गोवरवर मात करण्यासाठी चिमुरड्यांना अतिरिक्त डोस मिळणे आवश्यक; वैज्ञकीय तज्ज्ञ असे का म्हणतायत पाहा