Maharashtra Politics | Marathi News LIVE : मविआची एकत्रित पत्रकार परिषद

Maharashtra News | Marathi News LIVE Today: दिवसभरातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई पुणे नागपूरसह राज्यातील महत्त्वाची शहरं व गावांतील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रिकेट, फिफा विश्वचषक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर... 

Maharashtra Politics | Marathi News LIVE : मविआची एकत्रित पत्रकार परिषद

5 Dec 2022, 20:22 वाजता

17 डिसेंबरला मविआ महामोर्चा काढणार

Uddhav Thackeray | Maharashtra Politics : राज्यपाल कोश्यारींविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालीय. राज्यपालांविरोधात तसंच महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या प्रत्येकाविरोधात एकजूट व्हा असं आवाहन करत मविआनं मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केलीय. महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा काढणार. उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत अशा मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. 

बातमी पाहा - https://bit.ly/3UBiru6

5 Dec 2022, 19:36 वाजता

मविआ नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद

Uddhav Thackeray | Maharashtra  Political News : महाराष्ट्राची सतत अवहेलना केली जातेय - उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray).  गद्दारी, कट कारस्थानानं करून मविआचं सरकार पाडलं, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न सुरूय - उद्धव ठाकरे. कर्नाटकनं इशारा देताच दौरा रद्द हा महाराष्ट्र सरकारचा नेभळटपणा, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल.

बातमी पाहा - https://bit.ly/3UBiru6

5 Dec 2022, 18:04 वाजता

जतमधील गावं कर्नाटकात जाणार नाहीत

Uday Samant on Jat Water | Maharashtra Political News : सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकात जाण्याचा वाद अखेर मिटलाय. पाण्यापासून वंचित असलेल्या 42 गावातील दुष्काळग्रस्तांशी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी आज थेट संवाद साधला. म्हैसाळ विस्तारीत पाणी योजना लवकर पूर्ण होईल आणि तोपर्यंत 42 गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. तेव्हा पाणी मिळालं तर कर्नाटकात जाणार नाही, असं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार (Sunil Potdar) यांनी स्पष्ट केलं. सरकारनं आश्वासन पाळलं तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, असंही ते म्हणाले.

बातमी पाहा - https://bit.ly/3Fp5oYm

5 Dec 2022, 15:14 वाजता

समृद्धा महामार्गावर भरावा लागणार एवढा टोल

Samruddhi Expressway Toll Rate | Marathi News LIVE : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 11 तारखेला लोकार्पण होणार आहे. यावेळी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) नेमका किती टोल भरावा लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे...समृद्धी महामार्गावर प्रति किलोमीटर चार चाकी वाहनांसाठी 1 रुपये 73 पैसे टोल आकारणी राहणार आहे...म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या 520 किमी अंतरासाठी 900 रुपये टोलदर आहे...

बातमी पाहा - समृद्धी महामार्गावर 'ही' असणार टोल देयकाची रक्कम; पाहा व्हिडिओ

 

5 Dec 2022, 15:08 वाजता

आफताबला फाशीवर पोहोचवणार 5 पुरावे

Shraddha Walkar Murder Update : श्रद्धा हत्याकांडात फाशी होण्यापासून आफताब आता काही पावलंच दूर आहे. कारण आफताबला (Aftab) फाशीवर पोहचवणारे 5 महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. श्रद्धाची हत्या आफताबनेच केल्याचे हे पुरावे आहेत. विशेष म्हणजे श्रद्धाच्या (Shraddha Walkar) जबड्याचे अवशेष हा यातला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. या जबड्यात दातांमध्ये मेटलचा तुकडा सापडलाय, जो मुंबईतल्या एका डॉक्टरने बसवला होता. त्यामुळे पोलिसांना आता श्रद्धाच्या डीएनए अहवालाची (Shraddha Walkar DNA Report) प्रतीक्षा आहे. पोलिसांनी श्रद्धाची अंगठीही ताब्यात घेतलीय. श्रद्धाच्या हत्येनंतर ही अंगठी आफताबने त्याच्या दुस-या गर्लफ्रेंडला दिली होती. पोलिसांनी डॉक्टर्सचे जबाबही नोंदवले आहेत. यात श्रद्धाच्या दातांमध्ये मेटलचा तुकडा बसवणारा डॉक्टर... तसंच चाकूमुळे हात कापल्यानंतर आफताबवर उपचार करणा-या डॉक्टरचा समावेश आहे.

बातमी पाहा - आफताबला फासावर लटकवणार 'हे' 5 पुरावे

5 Dec 2022, 14:32 वाजता

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गट आक्रमक

Maharashtra GramPanchayat Election  : राज्यात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानंही (Shinde Group) कंबर कसलीय. बुधवारी ग्रामपंचायत निवडणुकीच्य तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नंदनवन निवासस्थानी दिवसभर विभागनिहाय आढावा बैठक पार पडणार आहे.

बातमी पाहा - ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी 'या' दिवशी आखणार नवा प्लॅन

5 Dec 2022, 14:11 वाजता

मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द

Maharashtra - Karnatak Border Dispute | Minister Karnatak Tour Cancel : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचा उद्याचा कर्नाटक दौरा रद्द झालाय...दौरा रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी (DCM Devendra Fadanvis) दिलीय...सीमावादाचा निर्णय सुप्रीम कोर्ट (Supreme Court) घेईल, आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखु शकत नाही असं ते म्हणाले... यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. दरम्यान कर्नाटक मुख्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलंय. कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळे दोन कॅबिनेट मंत्र्यांनी बेळगाव दौरा करु नये, असं या पत्रात म्हटलंय. 

बातमी पाहा - "कोणी रोखू शकत नाही पण..."; बेळगाव दौरा रद्द झाल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

5 Dec 2022, 12:34 वाजता

एकनाथ शिंदे आणि जे.पी.नड्डांची भेट

Eknath Shinde Meet J.P.Nadda | Maratahi News LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात बैठक झाली. दिल्लीत (Delhi) दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याची माहिती समजतेय. 

5 Dec 2022, 12:19 वाजता

होम, कार लोनचा ईएमआय वाढणार?

RBI News | Marathi News LIVE : सर्वसामान्यांना लवकरच मोठा झटका बसू शकतो. कारण रिझर्व्ह बँक (RBI) रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. आजपासून ते 7 डिसेंबरपर्यंत पतधोरण आढाव्याबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. यात रेपो रेट वाढीबाबत (Repo Rate) चर्चा करुन 7 डिसेंबरला घोषणा होण्याची शक्यता आहे. व्याजदर 0.25 ते 0.35 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे होम लोनसह कार लोनचा ईएमआय वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा भार पडू शकतो.

5 Dec 2022, 11:52 वाजता

संजय राऊतांचा भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल

Sanjay Raut On BJP | Marathi News LIVE : शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपालांवर (Bhagat Singh Koshyari) अजूनही कारवाई झालेली नाहीये...त्यावरून राऊतांनी भाजप, शिंदे गटावर निशाणा साधलाय...राजभवनात जाऊन चहा, बिस्कीट न खाता राज्यपालांना (Governor of Maharashtra) जाब विचारा...त्यांना कारे करून दाखवा, पण, भाजपच्या मनगटात हिंमत नसल्याचं राऊतांनी म्हटलंय...तर सीमावादाबाबत दोन मंत्र्यांनी कर्नाटक नव्हे पण, सीमारेषेला तरी स्पर्श करून यावं असं आव्हान राऊतांनी (Sanjay Raut) दिलंय...

बातमी पाहा - "राजभवनात घुसून राज्यपालांची बिस्किटं न खाता..."; संजय राऊतांनी भाजपला सुनावलं