Mahavitaran Strike Latest News : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल झाली आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम आहेत.
4 Jan 2023, 07:49 वाजता
खासगीकरणाला तीव्र विरोध, चर्चा फिस्कटल्याने 72 तासाचा संप अटळ
Mahavitaran Strike News : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या हालचालींविरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. अदानी कंपनीला वीज वितरण परवानगी मिळाली तर कर्मचारी आणि ग्राहकांना खर्चात लोटण्याचा प्रकार असेल त्यामुळे परवानगी देऊ नये, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रधान ऊर्जा सचिव आणि तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली. मात्र ती फिस्कटल्यामुळे 72 तासाचा संप अटळ आहे.
4 Jan 2023, 07:37 वाजता
पुण्यात अनेक ठिकाणी बत्ती गुल
Mahavitaran Strike News : वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात लाईट बंद झालीय. वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने रात्रीपासूनच लाईट बंद आहे. तर शहरातही अनेक ठिकाणी कर्मचारी संपावर असल्यानेही वीजपुरवठा खंडीत झालाय.
4 Jan 2023, 07:22 वाजता
संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी बैठक
Mahavitaran Strike News : राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. महावितरण संपकरी संघटना कर्मचारी तसsच महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
4 Jan 2023, 07:21 वाजता
वीज कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा, ... तर मेस्मा लावणार
Mahavitaran Strike News : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारलाय. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिलाय. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय.