PM Narendra Modi Mumbai Visit Highlights : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro Inaugration) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi)
19 Jan 2023, 19:14 वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्टेशनवरुन मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित आहेत.
19 Jan 2023, 18:34 वाजता
मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी नाही, केवळ तो पैसा योग्य ठिकाणी उपयोगात आला पाहिजे, तो भ्रष्टाचारात अडकला किंवा बँकेत पडून राहिला तर मुंबईकारांचं भविष्य उज्ज्वल कसं होणार, मुंबईतल्या रस्ते विकासासाठी डबल इंजिन सरकार कटिबद्ध
विकासाआड कधीही राजनिती आणू देत नाही. विकास हीच भाजपची प्राथमिकता आहे.
19 Jan 2023, 18:27 वाजता
शिंदे-फडणवीस यांच्या जोडीने विकासाला गती दिली, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार, शहरांच्या समस्या सोडण्यावर भर देणार, येत्या काही दिवसात मुंबईचा कायापालट होईल - मोदी
19 Jan 2023, 18:25 वाजता
जगभराती अर्थव्यवस्था डळमळीत झालीय, पण भारतात मात्र याचा कोणताही परिणाम नाही, 8 वर्षात असंवेदनशील दृष्टीकोन बदलतोय, महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारने विकासाला गती दिली.
19 Jan 2023, 18:19 वाजता
आजची विकासकामं मुंबईला उत्तम करण्यासाठी आहेत. भारतातील आशावद जगभरात दिसतोय. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मोटी स्वप्न पाहाण्याचं धाडस, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर देशात बनतंय. - पीएम मोदी
19 Jan 2023, 18:14 वाजता
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा सुरुवात मराठीतून केली. मोदींच्या हस्ते 40 हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण
19 Jan 2023, 17:59 वाजता
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो 2अ, मेट्रो 7 चं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 दवाखान्यांचं लोकार्पण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं लोकार्पण
मोदींच्या हस्ते 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं लोकार्पण
19 Jan 2023, 17:51 वाजता
मुख्यमंत्री शिंदे...
- फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मेट्रोचं काम जलद गतीने सुरू झाले. पण, मधल्या काळात काय झालं ते आपल्याला माहित आहेच... 'आपला दवाखाना' आज 20 ठिकाणी सुरू होईल ते मार्चपर्यत 100 'आपला दवाखाना' जनतेसाठी सुरू होतील... - डांबरीकरण नावाखाली काळ पांढरे करणारे दुकाण बंद होणार आहे. - काहीची पोटदुखी -मळमळ वाढली...आता सहा महिन्यात आपण विकास काम करतोय. पुढील दोन वर्षात अजून काम किती करू याची चिंता त्यांना आहे. ते टीका करत राहील पण आपण विकास काम करत राहू
19 Jan 2023, 17:48 वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण
महाविकास आघाडी काळात विकास किती झाली याची माहिती तुम्हाला..ठप्प झालेले विकास कामे आता पुन्हा होत आहे. - पीएम मोदी यांच्या धाडसी नेत्यामुळे विकास कामं पुन्हा सुरू झाली. - पंतप्रधान मोदी यांना पाहिले की सकारात्मक ऊर्जा मिळते.मुंबईकरांचे विकास काम सुरु कायापालट होताना दिसेल. - काही लोकांची इच्छा होती पीएम यांच्या हस्ते कार्यक्रम होऊ नये, पण नियती समोर काही चालत नाही. - बाळसाहेब ठाकरे आणि मोदी यांचे स्नेहसंबंध,हिंदुत्त्व दोन्हीची भूमिका
19 Jan 2023, 17:29 वाजता
20-25 वर्ष मुंबई महापालिकेवर ज्यांनी राज्य केलं, त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केलं, स्वत:ची घरं भरली, पण मुंबईकरांना कधी शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही