ग्लासगो : हवामान बदलाचा प्रश्न किती गंभीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. COP26 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पाहूनही असेच वाटले. हवामान बदलाच्या परिणामांवर व्याख्यान सुरू असतानाच जो बायडेन झोपेत होते. 'द सन'च्या वृत्तानुसार, COP26 शिखर परिषदेला उपस्थित असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन झोपत असताना एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. हवामान बदलाच्या परिणामांवर सुरू असलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती छोटीशी झोप घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Biden appears to fall asleep during COP26 opening speeches pic.twitter.com/az8NZTWanI
— Zach Purser Brown (@zachjourno) November 1, 2021
दक्षिण आफ्रिकेतील मानवाधिकार कार्यकर्ते एडी नडोपू अपंग लोकांवर हवामान बदलाच्या परिणामांवर भाषण देत होते. तेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष काही क्षण झोपले. त्यांच्या एका साथीदाराच्या नजरेस पडताच त्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जो बायडेनला जागे केले. यानंतर बायडेन यांनी भाषण ऐकल्यानंतर टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, बायडेन यांनी इतरांचे म्हणणे नीट ऐकले नसेल, पण जेव्हा त्यांचा भाषण देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी मोठ्या गोष्टी सांगितल्या. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले की, 'जग आपत्तीच्या दिशेने जात आहे, जग इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर उभे आहे यावर त्यांनी भर दिला. आमच्याकडे स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याची आणि स्वच्छ उर्जा भविष्यात निर्माण करण्याची क्षमता आहे.