मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडरची सर्वात मोठी अडचण दूर; भारतात कधी धावणार पहिली बुलेट ट्रेन

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 9, 2024, 12:41 PM IST
मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडरची सर्वात मोठी अडचण दूर; भारतात कधी धावणार पहिली बुलेट ट्रेन title=
100 percent Land Acquisition complete for Mumbai Ahmedabad bullet train

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली येथील जमीन अधिग्रहणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडोर असंही म्हणतात. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर जमीन अधिग्रहणची माहिती शेअर केली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 1389.49 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आलेली आहे. मुंबई आणि अहमदाबाददरम्यान बुलेट ट्रेनची आणखी करण्यात आली आहे. 

एनएचएसआरसीएल यांनी प्रकल्पाबाबत दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात 120.4 किलोमीटरचा गर्डर आखण्यात आले आहेत आणि 271 किलोमीटरपर्यंत खांब टाकण्यात आले होते. एमएचआरसी गलियार ट्रॅक सिस्टिमसाठी जपानी शिंकानसेनमध्ये वापरलेले प्रबलित काँक्रीट (RC) ट्रॅक बेड घालण्याचे काम सुरत आणि आनंद येथेही सुरू झाले आहे. भारतात पहिल्यांदाच जे-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टीम वापरण्यात येत आहे.

एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, 10 महिन्यात गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील जरोली गावाजवळ 12.6 मीटर व्यास आणि 350 मीटर लांबीचा माउंटेन टनलचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. गुजरातच्या सुरत जिल्ह्यात राष्ट्रीय राजमार्गावर 70 मीटर लांबीचा आणि 673 मीट्रिक टन वजनाचा पहिला स्टील पुल बांधण्यात आला आहे. तसंच, या प्रमाणे 28मधून 16 पुलांचे बांधकाम विविध टप्प्यात सुरु आहे.

एमएएचएसआर गलियारेवर 24मधून सहा नद्यांवर पुलांचे बांधकाम सुरू आहे. यात पार वलसाड जिल्हा, पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वलसाड जिल्हा) आणि वेंगनिया (नवसारी जिल्हा). नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती नद्यांवर काम सुरू आहे. 

भारतातील पहिल्या सात किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे काम सुरू झाले आहे. हा बोगदा महाराष्ट्रातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या बोगद्याचा एक भाग असून मुंबई HSR स्टेशनच्या बांधकामासाठी खोदकामही सुरू झाले आहे. NHSRCL ने सांगितले की, गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, आनंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती येथील HSR स्टेशन बांधकामाच्या विविध टप्प्यात आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी एकूण खर्च 1.10 लाख कोटी इतका आहे. या प्रकल्प 2022 साली पूर्ण होण्याची शक्यता होती. मात्र जमीन अधिग्रहण रखडल्याने व इतर तांत्रिक कारणांमुळं हा प्रकल्प लांबणीवर पडला. सरकारने 2026 पर्यंत दक्षिण गुजरातच्या सुरत आणि बिलीमोरापर्यंतच्या पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन सुरू करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.