वर्धा : Food News : एक धक्कादायक बातमी. वर्धा जिल्ह्यात दही कलाकंद खाल्याने 11 लोकांना अन्नातून बाधा झाली आहे. काल संध्याकाळी 6 वाजता ही घटना घडली. येथील हॉटेलमध्ये दही कलाकंद, दही समोसा खाल्याने 11 लोकांची प्रकृती खराब झाली आहे. (11 people were injured after eating curd-samosa in a hotel at Wardha )
वर्ध्यामधील आनंद नगर, अशोक नगर येथील काही जण अंबिका हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी दही कलाकंदची ऑर्डर दिली. त्यांनी हा अन्न पदार्थ खाल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. या 11 रुग्णांना वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातआले.
तर एकाची प्रकृती गंभीर झाल्याने सावंगी येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वर्धा शहराचे पोलीस निरीक्षक सत्यविर बंडीवार रुग्णालयात दाखल झाले आहेत.
अन्नबाधेत एका 5 वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. तर दोन महिलांनाही अन्नबाधा झाल्याची माहिती आहे. अन्नबाधा झालेल्या सर्व रुग्णांना उलटी, जुलाब यांचा मोठा त्रास सुरु झाला. नामांकित अंबिका हॉटेलच्या पदार्थ खाल्याने अन्नबाधा झाल्याने शहरात मोठी खळबळ आहे. 8 रुग्णांवर वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.