चंद्रपूरमध्ये खाजगी बसला अपघात, १५ प्रवासी जखमी

वरोरा शहराजवळ खाजगी बसला झालेल्या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. बागडी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस चंद्रपूरहून नागपूरकडे जात होती. वरोरा शहर ओलांडल्यावर महामार्गावरील एमआयडीसी वळणावर बस आणि टँकरची धडक झाली. 

Updated: Jul 2, 2017, 03:27 PM IST
चंद्रपूरमध्ये खाजगी बसला अपघात, १५ प्रवासी जखमी title=

चंद्रपूर : वरोरा शहराजवळ खाजगी बसला झालेल्या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. बागडी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस चंद्रपूरहून नागपूरकडे जात होती. वरोरा शहर ओलांडल्यावर महामार्गावरील एमआयडीसी वळणावर बस आणि टँकरची धडक झाली. 

बसमधील 40 पैकी 15 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. सर्व जखमींना उपचारासाठी वरोरा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यापैकी 6 गंभीर जखमींना चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आलंय. खासगी बसचा चालक मद्यधुंद असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.