१५५ विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं

चंद्रपुरात नागरिक आणि शिक्षकांनी तब्बल १५५ विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं आहे. कोरपना तालुक्यातील वडगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेलगत नाल्याला पूर आला होता. या नाल्याच्या संरक्षक भिंतींची उंची कमी असल्यानं पुराचं पाणी बाहेर आलं. त्यामुळे शाळेत १५५ विद्यार्थी अडकून पडले होते. अखेर शिक्षक आणि नागरिकांनी मानवी साखळी तयार करून या सर्वांची सुखरुप सुटका केली. 

Updated: Jul 7, 2018, 11:25 AM IST
 title=

चंद्रपूर : चंद्रपुरात नागरिक आणि शिक्षकांनी तब्बल १५५ विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं आहे. कोरपना तालुक्यातील वडगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेलगत नाल्याला पूर आला होता. या नाल्याच्या संरक्षक भिंतींची उंची कमी असल्यानं पुराचं पाणी बाहेर आलं. त्यामुळे शाळेत १५५ विद्यार्थी अडकून पडले होते. अखेर शिक्षक आणि नागरिकांनी मानवी साखळी तयार करून या सर्वांची सुखरुप सुटका केली. 

तब्बल तीन तास हा सुटकेचा थरार सुरु होता. विद्यार्थी सुखरुप सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.