नागपूर : नागपुरात मुसळधार पावसामुळे एकाचा बळी गेला आहे. पावसामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाह वाढला होता. या पाण्याच्या प्रवाहात निलेश चावके हा तरुण वाहून गेला आहे. तर महालगाव कापसी गावातीलाही एक तरुणही पावासाच्या पाण्यात वाहून गेला आहे.
हवामान खात्यानं नागपुरात आजही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज नागपुरात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी नागपूरला पावसानं झोडपल्यानंतर आज पावसाची विश्रांती आहे. शुक्रवारी झालेल्या पावसानं नागपूरचं जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वेसेवा कोलमडून पडली.
आजही कोल्हापूर गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. या पावसानं शहरात एकाचा बळी घेतला आहे.