औरंगाबाद : Aurangabad heavy rains lash : राज्यात मुसळधार पावसामुळे ( heavy rains lash) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल गेट्स टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकूण 9432 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ही आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. (18 Gates of Jayakwadi dam opened as heavy rains lash catchment area in Maharashtra's Aurangabad)
कालपासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सध्यस्थीतीतदेखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत एकूण 92.31 टक्के जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे. प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाल्याने आज 18 दरवाजे उघड्ण्यात येत आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकुण 9432 क्यूसेस विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येत आहेत. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावधनता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गोदावरी, दिंडोरी निफाड तालुक्यातल्या सर्व कादवा नदीकाठच्या गावक-यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेक वेगाने गोदावरीमध्ये पाणी सोडले जात आहे. तर पालखेड धरण समूहातील सर्व धरण भरल्याने साडेतीन हजार क्युसेक वेगाने या नदीतून विसर्ग केला जातोय. गोदावरी आणि दिंडोरी निफाड तालुक्यातल्या सर्व कादवा नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात पुनद आणि चणकापूर धरणामधून अकरा हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. ढवळे मालेगाव परिसरातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये झालेल्या जोरदार पावसाने जटवाडारोडवरील बंधारा फुटला त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. आज जटवडा येथील एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये एम एस सी इ टी 2021 ची परीक्षा देण्यासाठी या सेंटरवरील सर्व विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या परीक्षेचा काय हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. केवळ औरंगाबादच नाही तर नांदेड आणि इतर मराठवाड्याच्या भागातूनही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पोचले होते. त्यातील नांदेड येथून आलेल्या एका विद्यार्थ्यांनी आपण कसे अडकलो आणि सेंटरपर्यंत पोहोचू शकलो नाहीत याची कैफियत सांगितली.