Shegaon Railway Station : पुढील स्थानक 'शेगांव', गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

Central Railway : महाराष्ट्रातील तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. भाविकांची हीच गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून एक मोठी निर्णय घेण्यात आला आहे. 

Updated: Mar 27, 2023, 10:26 AM IST
Shegaon Railway Station : पुढील स्थानक 'शेगांव', गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर title=
Shegaon Railway Station

Shegaon Railway Station :  महाराष्ट्रातील तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव (Shegaon Railway Station ) हे गजानन महाराज (Gajanan Maharaj) यांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे. शेगावात गजानन महाराज यांचं मोठं मंदिर असून शेकडो भक्त रोज येथे भेट देतात. गजानन महाराजचं दर्शन केल्याने मन:शांती मिळते, असं भाविकांचे म्हणणे आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रींच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात. परंपरेनुसार श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्री राम जन्मोत्सवला देखील सुरूवात झाली आहे. भाविक गण गणात बोतेच्या गजरात तल्लीन होऊन गेले आहेत. याचपार्श्वभूमीवर संत गजाजन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

आता संत गजाजन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. अकोला रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सहा महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी करण्याची शक्यता आहे. ही ट्रेन येत्या 31 मार्चपासून पुढील सहा महिने शेगाव स्थानकावर थांबणार आहे. 

वाचा: पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढणार? एका SMS वर चेक करा आजचे दर 

यामध्ये नागपूर- पुणे-नागपूर एक्स्प्रेस (22141/22142) ही ट्रेन येत्या 31 मार्चपासून शेगावं स्थानकावर थांबणार आहे. तर दुसरी ट्रेन अमृतसर-नांदेड एक्स्प्रेसला 28 मार्चापासून, तर 12421 नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसला 29 मार्च पासून शेगावं स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. गाडी क्र. 12752 जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस 27 मार्चपासून ,तर गाडी क्र. 12751 नांदेड-जम्मुतावी हमसफर ही गाडी 31 मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे. 

'वंदे भारत' ला कल्याणमध्ये थांबा...

अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. त्यापैकी मुंबई शिर्डी एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा आहे. परंतु मुंबई सोलापूर या एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा नाही. यासाठी आपण सुरवातीपासून प्रयत्नशील असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासना सोबत बैठकीत ही मागणी लावून धरल्याने त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली असून लवकरच कल्याण या ठिकाणी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा मिळणार आहे.