ओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर

ओखी चक्रीवादळामुळे दक्षिण भारताला तडाखा बसलाय. या वादळामुळे अनेक बोटी समुद्रात भरकटल्या आहेत. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 3, 2017, 04:19 PM IST
ओखी चक्रीवादळाने २८ बोटी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर title=

रत्नागिरी : ओखी चक्रीवादळामुळे दक्षिण भारताला तडाखा बसलाय. या वादळामुळे अनेक बोटी समुद्रात भरकटल्या आहेत. 

या भरकटलेल्या बोटींपैकी अनेक बोटी कोकण किना-यावर पोहचल्यात. रत्नागिरी समुद्र किना-यावर जवळपास 28 बोटी पोहचल्यात. यांत  तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील बोटींचा समावेश आहे. 

तामिळनाडूतील 23, कर्नाटक आणि केरळमधील प्रत्येकी 3 बोटीही रत्नागिरीच्या समुद्र किना-यावर धडकल्यात. तटरक्षक दलाकडून या बोटीतील नागरिकांशी संपर्क करुन मदत पोहचवली जात आहे. 

ओखी चक्रीवादळ, रत्नागिरी, ratnagiri, okhi cyclone