महाबळेश्वरमध्ये साचला ३ टन कचरा

 महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं. 

Updated: Jan 1, 2018, 11:20 AM IST
 महाबळेश्वरमध्ये साचला ३ टन कचरा title=

महाबळेश्वर :  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरला लाखो पर्यटकांनी पसंती दिली. पण त्य़ानंतर महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं. 

३ टन कचरा

हा संपूर्ण कचरा साफ करायला नगरपालिका कर्मचा-यांना रात्री १ ते पहाटे पाचपर्यंत मेहनत घ्यावी लागली. तब्बल ३ टन कचरा इथून काढण्यात आला. 

पारा ६ अंशावर 

वेण्णा लेक इथे ६ अंशावर पारा घसरलेला असतानाही अशा कडाक्याच्या थंडीतही सफाई कर्मचारी काम करत होते.

पर्यटकांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात केलेल्या पार्ट्या दारुच्या बाटल्यांचा खच पहायला मिळाला.

पण पालिकेच्या कर्मचा-यांनी तीन ते चार तासांत हा सगळा कचरा साफ करून नववर्षाचं स्वागत स साफसफाई करत आणि स्वच्छतेचा संदेश देत केलंय. 

पर्यटकांना नाही भान 

 इथे आलेल्या पर्यटकांनीच जर भान राखलं असतं आणि अस्वच्छता केली नसती तर कडाक्याच्या थंडीत या कर्मचाऱ्यांनाही काम करावं लागलं नसतं.