Maharashtra Political News : कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या संबधीत असलेल्या बँकेत ईडी अधिकाऱ्यांकडून 30 चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान एकाकर्मचा-याला हृदयविकाराचा झटका आला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Kolhapur District Central Bank) ईडीने धाड टाकली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत. बुधवारी 1 फ्रेबुवारी 2022 रोजी सकाळीच ईडीचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले. तेव्हापासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशी सुरु आहे.
ईडी चौकशी सुरू असताना बँकेच्या कर्मचा-याला हृदयविकाराचा झटका आलाय. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ईडी चौकशी सुरू आहे. साखर कारखाना विभागातले सहाय्यक व्यवस्थापक सुनील लाड यांची सलग तीस तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर लाड यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर बँकेतले कर्मचारी आक्रमक झालेत. बँकेच्या दारात कर्मचारी संघटनेनं आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे.
ईडी कारवाईविरोधात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचा-यांनी एक तास काम बंद आंदोलन केले. बँकेमध्ये ईडीनं तब्बल 30 तास कसून चौकशी केली. चौकशीनंतर जिल्हा बँकेच्या 5 अधिका-यांना ईडीनं ताब्यात घेत त्यांना मुंबईत आणण्यात आले असल्याचे समजते.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक माने, साखर कारखान्याचे व्यवस्थापक आर.जे.पाटील, उप व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, साखर कारखाना निरीक्षक सचिन दोदकर यांना ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. ईडी अधिका-यांनी तब्बल 30 तास बँकेतल्या कागदपत्रांची झाडाझडती घेतली.
इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे या साखर कारखान्यात देखील ईडीचे अधिकारी पोहोचले. काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांच्या घरावर, त्यांचे निकटवर्ती असणारे सहकारी आणि जावई यांच्या घरावर ईडीने धाड टाकली होती, त्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली होती.
यापूर्वी 12 जानेवारी 2023 रोजी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरी ईडीचे (Hasan Mushrif Kagal Home ED Raid) अधिकारी दाखल झाले होते. तब्बल 14 तास हसन मुश्रीम यांची चौकशी सुरु होती. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. घोटाळ्याचे आरोप करत सोमय्या यांनी मुश्रीफांच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. मुश्रीफांच्या शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.