आश्चर्य! महाराष्ट्रातील 'या' गावात माकडाच्या नावावर 32 एकर जमीन, काय आहे कारण? जाणून घ्या

Monkey Landowner Maharashtra Village: शेती, जमीन आणि घरातील हिस्स्यावरून भावकीत वाद होणं नवीन नाही. कधी कधी हा वाद जीवावर बेततो. अशी अनेक प्रकरणं वारंवारं समोर येतात. पण महाराष्ट्रातील जिल्ह्यात (Maharashtra District) माकडांच्या (Monkey Village) नावावर तब्बल 32 एकर जमीनीची नोंद आहे. 

Updated: Oct 19, 2022, 01:37 PM IST
आश्चर्य! महाराष्ट्रातील 'या' गावात माकडाच्या नावावर 32 एकर जमीन, काय आहे कारण? जाणून घ्या title=

Monkey Landowner Maharashtra Village: शेती, जमीन आणि घरातील हिस्स्यावरून भावकीत वाद होणं नवीन नाही. कधी कधी हा वाद जीवावर बेततो. अशी अनेक प्रकरणं वारंवारं समोर येतात. पण महाराष्ट्रातील धाराशीव जिल्ह्यात (Maharashtra Dharashiv District) माकडांच्या (Monkey Village) नावावर तब्बल 32 एकर जमीनीची नोंद आहे. उपला ग्रामपंचायतीतील (Upala Grampanchayat) भूमि अभिलेखावर 32 एकर जमीन माकडांच्या नावावर असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. सातबाराच माकडाच्या नावावर असल्याने उपला गावात माकडांचा वेगळाच थाट आहे. माकड कुणाच्याही दारात गेलं की त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळते. 

उपला गावचे सरपंच बप्पा पडवळ यांनी सांगितलं की, "जमीन माकडांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रांवर स्पष्टपणे नमूद केले आहे, परंतु प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी आणि केव्हा केली माहिती नाही. पूर्वी गावात माकडं हा सर्व विधींचा एक भाग होता. गावात आता सुमारे 100 माकडे आहेत. प्राणी एकाच ठिकाणी जास्त काळ राहात नसल्यामुळे त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे." वनविभागाने जमिनीवर वृक्षारोपणाचे काम केले असून, या भूखंडावर एक पडीक घरही होते, ते आता कोसळले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

Credit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव

“पूर्वी गावात जेव्हा लग्न असायचं तेव्हा माकडांना भेटवस्तू दिली जायची आणि मगच समारंभ सुरू व्हायचा. आता ही प्रथा तितकी पाळली जात नाही. गावकरी माकडं जेव्हा त्यांच्या दारात येतात तेव्हाच त्यांना खायला घालतात. त्यांना कोणीही खाण्यास मनाई करत नाही.", असं उपला गावचे सरपंच बप्पा पडवळ यांनी सांगितलं.