धक्कादायक : दहावी बारावीचे ३३ टक्के विद्यार्थी असा वेगळा विचार करतायत...

 61 टक्के विद्यार्थी आणि पालकांनी संमती दर्शवलीये तर 19 टक्के लोकांनी ऑफलाइन परीक्षेची मागणी केली, तर 21 टक्के कोणत्याही पद्धतीने परीक्षा देण्यास तयार आहेत.

Updated: Mar 9, 2021, 07:00 PM IST
धक्कादायक : दहावी बारावीचे ३३ टक्के विद्यार्थी असा वेगळा विचार करतायत... title=

गणेश कावडे, झी २४ तास मुंबई :  राज्य सरकारने परीक्षांविषयी जे सर्वेक्षण केलं आहे, त्याबाबतीत दहावी आणि बारावीचे ३३ टक्के विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्याचा मूड नाहीय. कदाचित कोरोनामुळे नियमित शाळा-कॉलेज नसल्याने त्यांचा मूड खराब झाला असेल, पण ३३ टक्के विद्यार्थी या वर्षी परीक्षा न देण्याच्या मूडमध्ये असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून परीक्षा ऑनलाइन (Online) घ्यायची, की ऑफलाइन (Ofline) किंवी आणखी काही पर्याय आहे का? यासाठी सर्वेक्षणात घेण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये 1 लाख 58 हजार विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला.

यामध्ये बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी यासाठी 61 टक्के विद्यार्थी आणि पालकांनी संमती दर्शवलीये तर 19 टक्के लोकांनी ऑफलाइन परीक्षेची मागणी केली, तर 21 टक्के कोणत्याही पद्धतीने परीक्षा देण्यास तयार आहेत.

या सर्वेक्षणमध्ये ऑनलाइन परीक्षेला पसंती दर्शवली आहे. तरीसुध्दा, अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने 33 टक्के विद्यार्थी बोर्ड परीक्षा न देण्याचा विचार करत आहेत.

 

सर्वेक्षणातील महत्वाचे प्रश्न आणि उत्तर

1. बोर्ड परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जावी ?

61 % विद्यार्थ्यांच्या मते ऑनलाइन घेण्यात यावी
19 % विद्यार्थ्यांच्या मते ऑफलाइन घेण्यात यावी
20 % विद्यार्थी कोणत्याही पद्धतीने परीक्षा द्यायला तयार

2. सद्यस्थितीत अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने किंवा परीक्षेची तयारी नसल्याने चांगल्या मार्कासाठी यावर्षी ड्रॉप घेण्याचा विचार आहे का ?

33 %  विद्यार्थी ड्रॉप घेण्याच्या विचारात
44 % विद्यार्थी ड्रॉप घेणार नाहीत
23 % विद्यार्थी अजून संभ्रमात

या सर्वेक्षणात असेही लक्षात आले की 79 टक्के विद्यार्थी आणि पालक एप्रिल, मे मध्ये परीक्षा घेण्याच्या निर्णयावर समाधानी नाहीत.

79 टक्के लोकांच्या मते सध्याची स्थिती पाहता बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

तर 69 टक्के विद्यार्थी वर्षभरात झालेल्या ऑनलाइन शिक्षणावर समाधानी नसल्याचे समोर आलं आहे.

महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणीर की नाही? जर झाल्या तर कोणत्या पद्धतीने होतील? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडले होते. पालकांना आपल्या मुलांच्या भविष्या बद्दलचे अनेक प्रश्न पडले होते.

पण आता महाराष्ट्र सरकारने याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने घेणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले.