मुंबई : 'प्रदूषणमुक्त भारत' व 'बेटी बचाओ बेटी पढाओ' च्या प्रसारासाठी राज्यातील दोन तरुणांनी तब्बल ३५ दिवसांचा सायकल प्रवास केला.
३ जानेवारीला त्यांच्या हा प्रवास पूर्ण झाला असून त्यांनी एकूण ३८६८ किलोमीटरचा पल्ला कापला.
मुंबईच्या सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले अशी या तरुणींची नावे आहेत. दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या.
कधी शून्य तापमान तर कधी ४५ डिग्री सेल्सिअस तापमानही या प्रवास करत होत्या. या संपूर्ण प्रवासात विविध राज्यातील बाईक रायडर्स व सायकल रायडर्सच्या क्लब्सची त्यांना मदत झाली.
३५ दिवसांच्या या प्रवासात स्वावलंबी होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढल्याचे दोघी सांगतात. हव्या त्या क्षेत्रात, हव्या त्या गोष्टी... एक महिला म्हणून तुम्ही मिळवू शकता.
त्यामुळे महिलांनी आपल्या कुटुंबियांना त्यांची स्वप्न पटवून देऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला हवा, असा संदेश त्यांनी महिलांना दिला आहे.