मराठा आंदोलनात हिंसा प्रकरणी औरगाबादमध्ये 41 जण ताब्यात

 मराठवाड्यातील पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

Updated: Aug 12, 2018, 05:26 PM IST
मराठा आंदोलनात हिंसा प्रकरणी औरगाबादमध्ये 41 जण ताब्यात title=

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ, रेल्वरोको आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. मराठवाड्यात इतर ठिकाणीसुद्धा अशा घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. शुक्रवारपर्यंत एकुण ४१ जणांना ताब्यात घेतलं आहे. 

वाळूज एमआयडीसीतील तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात सात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी दीड हजार संशयितांविरोधात गुन्हे दाखल झाले असून ४१ जणांना  पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रेल्वे रोखल्याप्रकरणी जवळपास चार हजार आंदोलकांवर लोहमार्ग गुन्हा नोंदवण्यात आला आहे.