झी २४ तासचा दणका, औरंगाबाद जुगार प्रकरणी ५ जणांना अटक

  झी २४ तासनं औरंगाबादमधील जुगाराचा पर्दाफास केल्यानंतर औरंगाबादमधील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारलाय. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

Updated: Dec 21, 2017, 12:22 PM IST
झी २४ तासचा दणका, औरंगाबाद जुगार प्रकरणी ५ जणांना अटक title=

औरंगाबाद :  झी २४ तासनं औरंगाबादमधील जुगाराचा पर्दाफास केल्यानंतर औरंगाबादमधील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारलाय. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

सिडको आणि एमआयडीसी परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये जुगार पार्लरचा सुळसुळाट झालाय, तब्बल १६ ठिकाणी  हे धंदे सुरु आहे. 

दररोज या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होतेय. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत होते. झी २४ तासने या संदर्भातलं वृत्त प्रकाशीत केल्यानंतर पोलस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि पोलिसांनी छापेमारी  सुरु केली.