अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ ते मध्यप्रदेश मधील पांढुरणा पर्यत नव्याने तयार केलेल्या ९६ किलोमीटरच्या सिमेंटच्या राष्ट्रीय महामार्गाला केवळ दीड ते दोन वर्षांतच अनेक ठिकाणी भेगा गेल्याने महामार्गाच्या कामातील दर्जावर वाहन चालका कडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.महामार्गावर पडलेल्या भेगा या मोठया असल्याने अपघातही वाढले आहे. पाहूया एक रिपोर्ट
मध्यप्रदेश व अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या दोन शहराना अमरावती ला जोडण्यासाठी असलेल्या वरुड मोर्शी महामार्गाच्या नूतनीकरनासाठी केंद्र सरकारने दिलेल्या तबल ५३० कोटीतून या ९६ किलोमीटरच्या महामार्गाचे दीड ते दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण करन्यात आले होते. परंतु आता दोन वर्षातच या महामार्गाला अनेक ठिकाणी मोठं मोठ्या भेगा पडल्याने या सिमेंट महामार्गाच्या कामातील दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अमरावती वरून मोर्शी, वरुड आणि मध्यप्रदेश ला जोडणार हा महत्त्वाचा मार्ग असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या महार्गाचे बांधकाम करण्यात आले. पूर्वी असलेल्या डांबरी रोड ला वारंवार पडणारे जीवघेने खड्डे यातून वाहन चालकांना मुक्तता मिळावी म्हणून या महामार्गचे काम करण्यात आले होते. परंतु नव्याने बांधलेल्या ५३० कोटीच्या या महामार्गाही भेगा गेल्याने कमालीची आश्चर्य व्यक्त होत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचा आरोप आता अनेकांनी केला आहे.
नांदगाव पेठ ते मध्यप्रदेशातील पांढुर्णा पर्यंत असलेल्या ९६ किलोमीटरच्या या राष्ट्रीय महामार्गात दोन टप्पे आहे. पहिला टप्पा नांदगाव पेठ ते मोर्शी हा ४३ किलोमीटरचा टप्पा असून यासाठी तब्बल २४० कोटी रुपये खर्च करण्यात आले तर दुसरा टप्पा हा मोर्शी ते मध्यप्रदेश मधील पांढुरणा पर्यंत आहे या ५३ कीलोमीटरच्या कामासाठी तब्बल २९० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे परंतु या दोन्ही टप्प्यात अनेक ठिकाणी या भेगा पडले आहे.
दोन टप्प्यातील या राष्ट्रीय महामार्गावर साडेचार-साडेचार मीटर चे असे पॅनल आहे. या पूर्ण महामार्गा वरील तब्बल ९० पॅनल ला या भेगा गेल्या आहेत. हे खराब झालेल्या कामाची लांबी जवळपास २०० मीटर पेक्षा जास्त आहे. खराब झालेल्या ठिकाणच्या हा पूर्ण रस्ता पुन्हा खोदून नव्याने तयार गेला केला जाणार असल्याची माहिती ती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भोंडें यांनी दिली आहे
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून धुरा सांभाळनारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रोडकरी म्हणुन अनेक जण संबोधतात त्याने कारण म्हणजे त्यांनी देशभरात केलेल्या महामार्गाची भरमसाठ कामे परंतु गडकरी यांच्याच संकल्पनेतून तयार झालेल्या या रस्त्याला भेगा पडल्याने आता नितीन गडकरी कंत्राटदारावर काय कारवाई करतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.