नवी मुंबईत ६ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ

Updated: May 5, 2020, 09:50 PM IST
नवी मुंबईत ६ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण  title=

नवी मुंबई : आज नवी मुंबईमध्ये कोरोनाचे ४७ रुग्ण वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका ६ दिवसाच्या बाळाचा देखील समावेश आहे. या बाळाच्या आईला कोरोना झाला असल्याने तिला पालिकेच्या कोविड 19 या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३० एप्रिलला या महिलेची प्रसूती झाली होती. पण बाळाचे रिपोर्ट आज आले. ज्यात बाळाला कोरोनाची लागण झाल्याची समोर आलं आहे.

याआधी भाईंदरमध्ये ७ महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर रत्नागिरीत एका सहा महिन्याच्या बाळाने करोनावर यशस्वी मात केल्य़ाचं देखील पुढे आलं होतं.  तसेच वसई-विरारमध्ये एका ४ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. नवी मुंबईत कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३९५ वर पोहोचली आहे. आज नेरुळमध्ये १४, वाशीमध्ये ७, तुर्भेमध्ये ५, कोपरखैरणेमध्ये ७, ऐरोलीत ४, घणसोलीत ८ रुग्ण वाढले. आतापर्यंत कोरोनाचे ४९ रुग्ण बरे झाले आहेत. पण रुग्णांची वाढती संख्या हे चिंतेचं कारण बनलं आहे.