पुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक

पुणे शहरानजीक झोपड्यांना आज  आग लागली. या आगीत ७० ते ८० झोपड्या जळून खाक 

Updated: Apr 21, 2018, 01:29 PM IST
पुण्यात ७० ते ८० झोपड्या जळून खाक title=

पुणे : शहरानजीक झोपड्यांना आज सकाळी आग लागली. या आगीत ७० ते ८० झोपड्या जळून खाक झाल्यात. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी जवळपास ८० झोपड्या पडल्यात. अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. त्यापूर्वी आंबेडकर नगर झोपडपट्टीत आगीचं तांडव पाहायला मिळाले. दरम्यान, अग्निशम दलाच्या २० पेक्षा जास्त गाड्यांच्या मदतीने एका तासात आग निंयंत्रणात आणण्यात यश आलेय.