सामोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा व्हिडिओ

उल्हासनगरमधील एक किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारागीर पायाने समोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ मळत आहे. 

Updated: Mar 4, 2024, 07:15 PM IST
सामोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा व्हिडिओ title=

Ulhasnagar Viral video : गरगागरम  समोसे सर्वांनाच आवडतात. मात्र, हे समोसे कसे बनतात हे पाहिल्यावर समोसे खाण्याची इच्छाच मरुन जाईल. उल्हासनगरमध्ये एका मिठाईच्या दुकानात कारागीर पायाने सामोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ तुडवत असल्याचा व्हिडिओ समोर व्हायरल झाला आहे.  एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबधित दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.गावकऱ्यांनी देखील या  मिठाईच्या दुकानावर धडक देत दुकानातील साहित्य फेकून दिले.

ग्राहकाने रेकॉर्ड केला समोसे बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ

उल्हासनगरच्या कॅप नंबर ४च्या आशेळेपाडा भागात हरिओम स्वीट नावाच्या दुकानात धक्कादायक प्रकार घडला आहे.  गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हे  दुकान येथे आहे .या मिठाईच्या दुकानात कारागीर समोसेसाठी लागणारे पीठ पायाने तुडवत असल्याचे एका येथे नेहमी याणाऱ्या एका ग्राहकाने पाहिले. या ग्राहकाने मोबाईल मध्ये या किळसवाण्या प्रकाराचे रेकॉर्डिंग केले.  हा व्हिडिओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मिठाईच्या दुकानावर धडक देत इथल्या दुकान मालकाला याचा जाब विचारला. 

https://www.instagram.com/reel/C4GBAwLsK6Q/?igsh=bTRmOTJzejVtZ3V6

ग्रामस्थ आक्रमक

दरम्यान यापुढे दुकानात बनवले जाणारे साहित्य विकायचे नाही. पॅकिंग फूड विकायचे असे गावकऱ्यांनी या दुकान मालकाला समजावले. त्यानंतर दुकान मालकाने देखील झालेली चूक कबूल करत यापुढे असे होणार नाही असं गावकऱ्यांना सांगितलं .मात्र या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.  गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हे स्वीट मार्ट सुरु आहे.  अनेक गावकरी याच दुकानातून मिठाई खरेदी करत होते. मात्र या दुकानदाराने गावकऱ्यांची फसवणूक केली असून आता हे दुकान या ठिकाणी चालू देणार नाही असा देखील पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.