आई-बापाच्या जीवाला धास्ती; आठ महिन्याच्या बाळाचा 2.50 लाखात सौदा

नागपुरात आठ महिन्याचा बाळाच अपहरण करून विक्री करण्याच्या बेतात असणाऱ्या टोळीतील काही साथीदारांना अवघ्या पाच तासात पोलिसांनी अटक केली. 

Updated: Nov 11, 2022, 10:23 PM IST
आई-बापाच्या जीवाला धास्ती; आठ महिन्याच्या बाळाचा 2.50 लाखात सौदा title=

पराग ढोबळे, झी मीडिया नागपूर :  लहान बाळांची चोरी करुन तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा नागपूर पोलिसंनी पर्दाफाश केला आहे. आठ महिन्यांच्या बाळाचं अपहरण करून विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी पाच तासात अटक केली आहे. आठ महिन्याचं फक्त बाळ पाच तासात आईच्या कुशीत आले. या टोळीचे कनेक्शन कुठपर्यंत आहेत याचा पोलिस शोध घेत आहेत.   नागपुरात आठ महिन्याचा बाळाच अपहरण करून विक्री करण्याच्या बेतात असणाऱ्या टोळीतील काही साथीदारांना अवघ्या पाच तासात पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यशस्वी कामगिरी करत  बाळ सुखरुप परत आईच्या स्वाधीन केले आहे. बाळाचा आईनेही काळजाचा तुकडा परत मिळाल्यानं पोलिसांचे आभार मानले. 

मोठ्या रॅकेटचा भांडाफोड

या प्रकरणानंतर पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या टोळीने आणखी काही लहान मुलांची तस्करी केल्याचा धागेदोरे हाती लागल्यानं पोलिसांनी त्या दिशेन तपास सुरू केला आहे.

असे चोरले बाळ

नागपूरच्या कळमना परिसरात राहणाऱ्या एका मातेचे बाळ चोरीला गेले आहे. ही महिला सामान्य रोजमजुरी करते. आरोपी या महिलेच्या कुटुंबाच्या घरासमोरच राहत होते. त्याने महिलेचा विश्वास संपादन केलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास आठ महिन्याच्या बाळाला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने घेऊन फरार झाला. आई-वडिलांनी बाळ घेऊन जाणाऱ्याची शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने त्यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार केली. 

बाळाचा 2.50 लाखात सौदा

या बाळाचा अडीच लाखात सौदा करून एका दाम्पत्याला विकणार होते. सुदैवाने पोलिसांनी प्रयत्न हाणून पाडला. या दरम्यान शोधा शोध करत चक्र फिरवले. तीन पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शोधा शोध केली. 

100 CCTV फुटेज तपासले

100 सीसीटी फुटेज तपासले. यामध्ये या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये फरजान उर्फ असार कुरेशी, सिमा परवीन अब्दुल राउफ अन्सारी, बादल धनराज मडके, सचिन रमेश पाटील यांचा समावेश आहे. तर, मुलाचं अपहरण करणारे मुख्य आरोपी योगेंद्र आणि त्याची पत्नी रिता प्रजापती तसेच श्वेता नावाची महिला पळून गेले आहेत.