Shocking News : आईचे निधन होताच दोन तासातच मुलाचा मृत्यू, तर पतीच्या निधनानंतर पत्नीनेही जीव सोडला

आधी आईचा मृत्यू आणि दोन तासानंतर मुलाचा ही मृत्यू. सांगली (sangali) जिल्ह्यातील कारंदवाडी येथे ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही जीव सोडला आहे. नाशिकमध्ये (Nashik) ही हृदयपिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. या दुख:द घटना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Updated: Jan 18, 2023, 10:40 PM IST
Shocking News : आईचे निधन होताच दोन तासातच मुलाचा मृत्यू, तर पतीच्या निधनानंतर  पत्नीनेही जीव सोडला  title=

रविंद कांबळे, झी मीडिया, सांगली : आधी आईचा मृत्यू आणि दोन तासानंतर मुलाचा ही मृत्यू. सांगली (sangali) जिल्ह्यातील कारंदवाडी येथे ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही जीव सोडला आहे. नाशिकमध्ये (Nashik) ही हृदयपिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. या दुख:द घटना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

दुर्धर आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाच्या प्रकृतीच्या चिंतेने आईची प्रकृती बिघडली. मग बघता बघता आईने प्राण सोडले. त्यानंतर अवघ्या दोन तासातच मुंबईत उपचार घेणाऱ्या मुलाने देखील आपले प्राण सोडले. हृदय हेलावून टाकणारी ही घटना वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी या ठिकाणी घडली आहे.  शहाबाई विलास पाटील (वय 62) आणि शहाजी विलास पाटील (वय 43) अशी या दोघा माय - लेकाची नावे आहेत.

मकर संक्रांतीच्या दिवशी या दोघा मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून मुलगा शहाजी आजारी होता. मात्र त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे आई शहाबाई यांना या गोष्टीची चिंता लागून राहिली होती. याच चिंतेतून त्यांची देखील प्रकृती बिघडली आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर, दुसरीकडे दोन तासाच्या अंतराने मुंबईत उपचार सुरू असणाऱ्या मुलाचाही मृत्यू झाला.

पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नीने जीव सोडला

नाशिकमधील उमराणे गावात देखील अशीच घटना घडली आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारे हिरामन पंढरीनाथ देवरे यांचं निधन झालं. पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नी विमलबाई यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दोघा पती-पत्नी मधील असलेलं प्रेम पाहून उमराणे गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले.  दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.