कबुतराने केली कमाल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद?, अधिक जाणून घ्या

दरम्यान बुलेट राजाने सात दिवसात तब्बल एक हजार कोलोमीटरचे अंतर पार करुन प्रथम क्रमांक मिळवला होता. 

Updated: Nov 12, 2022, 12:37 PM IST
कबुतराने केली कमाल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद?, अधिक जाणून घ्या title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर: पशु-पक्षी (Pet) पाळणे हा अनेकांचा छंद असतो त्यामाध्यमातून अनेक नागरिक आपल्या पशु पक्षामुळे नावारूपाला येत असताना नुकतेच पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील एका कबुतराने आपल्यासह आपल्या मालकाचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) मध्ये नोंद केले आहे. तळेगाव ढमढेरे येथील सोयब बागवान या युवकाला कबुतरे पाळण्याचा छंद असून त्याने अनेक कबुतरे पाळलेली आहेत. त्यापैकी काही कबुतरे शर्यतीमध्ये सहभागी होणारी असून सोयब याने यापूर्वी मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याच्या बुलेट राजा (Bullet Raja) या कबुतराच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. (a pigeon name is recorded in the world book of records)

दरम्यान बुलेट राजाने सात दिवसात तब्बल एक हजार कोलोमीटरचे अंतर पार करुन प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांनतर सोयब याने याबाबतची माहिती वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या साईट वर नोंदवली असता नुकतेच बुलेटराजा या कबुतराची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (Book of Record) मध्ये नोंद होऊन सोयब बागवान यांना त्याबाबतचे पदक व प्रमाणपत्र (Certification) प्राप्त झाले आहे तर सोयब यांच्या बुलेट राजा या कबुतराची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे सोयब बागवान यांचे पुणे जिल्हयासह महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

बारामतीच्या पोरानं कमावलं नाव : 

तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीच्या रोहित शिंदे याने देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे. तामिळनाडूमधील कोईमतूर येथील सी.आर.एफ कंपनीने स्टंट वॉरफेर (Stunt Warfere) राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये फ्री स्टाईल स्टंट राईडींग (Freestyle Stunt Riding), ऑफस्टीकल टाईम चॅलेंज (Obstacle Time Challenge) व लास्ट मॅन स्टँडींग (Last Man Standing) या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले आहे. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

मोटार सायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची ही स्पर्धा होती. केवळ 8 मिनिट 28 सेकंद एवढ्या कमी वेळात एका चाकावर वरील तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले आहे. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट राईडींगमधील (Stunt Riding) पहिला खेळाडू ठरला आहे.