Dombivli Crime News: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नराधम रिक्षा चालकासह त्याच्या आणकी एका साथीदाराला पोलिासांनी अटक केली आहे. गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीसांच्या सतर्कतेमुळे हे नाराधम पोलिसांच्या हाती लागले आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
पीडित महिला डोंबिवलीच्या खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कोळेगाव येथे रिक्षातुन घरी येत होती. यावेळी महिलेचे रिक्षा चालकाने तिचे अपहरण केले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्या वर साथीदाराच्या मदतीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्तीवर असणाऱ्या डोंबिवली मानपाडा पोलिसांनी त्या आधीच या नराधम आरोपीना ताब्यात घेतले. प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे आरोपींची नावे आहेत.
पीडित महिला डोंबिवली खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन ती घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती.यावेळी एका रिक्षात ती बसली. त्यात आणखी एक प्रवासी बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावत जायचे असे सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने थोड्याच अंतरावर रिक्षा एका निर्जनस्थळाकडे वळवली. महिलेला संशय आल्याने तिने रिक्षाचालकाला विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशाने तिच्या तोंडावर धारदार शस्त्र लावून दोन्ही हाताने तिचे तोंड दाबून धरले.
ही रिक्षा पुढे जात असताना गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांनी पाहिले. त्यांना संशय आल्याने त्यांनी रिक्षाचा पाठलाग केला. यावेळी पीडितेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, यावेळी त्यांनी पोलिसांवर तीक्ष्ण हत्यारे उगारली. मात्र, पोलिसांनी त्यांना सोडले नाही.दोघेही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. मात्र, पोलिसांच्या धाडसामुळे पीडितेचे अब्रू वाचली.त्यामुळे या पोलिसांचे कौतुक होत आहे.
कल्याण स्टेशन परिसरात विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. आरोपीकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.