mumbai local mega block : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी २ मार्च रोजी कल्याण – कसारा विभागातील अप आणि डाउन ईशान्य मार्गांचा समावेश करून एकात्मिक विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.
रोड क्रेन वापरून खडवली आणि वासिंद स्थानकांदरम्यान किमी क्रमांक ७३/१७-१९ येथे पुल क्रमांक ७३/२ वर PSC गर्डरचे लॉंचींग केले जाणार आहे. आसनगाव आणि आटगाव दरम्यान पादचारी पुलाचा (एफओबी) गर्डर लाँच करणे अप आणि डाउन ईशान्य लाईन कव्हर करणे. शहाड आणि आंबिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर पादचारी पुलाचा (एफओबी) गर्डर् लॉंचींग केले जाणार आहे.
ट्रॅफिक ब्लॉक विभाग आणि कालावधी: ००.४५ ते ०५.१५ टिटवाळा ते आसनगाव (दोन्ही स्थानके वगळता) डाऊन ईशान्य विभागात आणि वाशिंद ते टिटवाळा (दोन्ही स्टेशन वगळता) अप ईशान्य विभागात हा ब्लॉक असणार आहे.
कसारा कडे जाणारी एन १ (N1) लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ००:१५ वाजता सुटेल आणि ठाणे पर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी एन २ (N2) लोकल कसारा येथून ०३:५१ वाजता सुटणारी गाडी शॉर्ट ओरीजनेट करण्यात येऊन ठाणे येथून सुटेल. अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल :-
१२१०६ (गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / विदर्भ एक्सप्रेस) दि. ०२.०३.२०२४ रोजी गोंदिया येथून २ तास उशिराने सुटेल. (सुटण्याची निर्धारीत १४.४० वाजता).
1. 12141 (लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र एक्सप्रेस) ०२.०३.२०२४ रोजी - ०३.४५ वाजता सुटेल.
2. 11057 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -अमृतसर एक्सप्रेस) ०२.०३.२०२४ रोजी - ०३.५५ वाजता सुटेल.
3. 12811 (लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया एक्सप्रेस) ०३.०३.२०२४ रोजी रोजी ०४:१० वाजता सुटेल.
4. 22177 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -वाराणसी महानगरी एक्सप्रेस) ०३.०३.२०२४ रोजी ०४:२० वाजता सुटेल.
5. 22538 (लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस) ०३.०३.२०२४ रोजी - ०४:३५ वाजता निघेल.
1. 18030 अप (शालिमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस) आटगाव येथे ०२.३० ते ०५:१० पर्यंत नियमित केली जाईल.
2. 12810 अप (हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस) ०२.३० ते ०५.१० पर्यंत खर्डी येथे नियमित केले जाईल.
3. 20104 अप (गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस) कसारा येथे ०२.४५ ते ०५:०५ पर्यंत नियमित केली जाईल.
4. 11402 अप (आदिलाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / नंदीग्राम एक्सप्रेस) कसारा येथे ०३.२३ ते ०५:१५ पर्यंत नियमित केली जाईल.
5. 12152 अप (शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस) इगतपुरी येथे ०२.५५ ते ०५:२० पर्यंत नियमित केली जाईल.
6. 12112 अप (अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस) ०३.३० ते ०५.३० पर्यंत इगतपुरी येथे नियमित केली जाईल.
7. 17058 अप (सिकंदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / देवगिरी एक्स्प्रेस) भुसावळ विभागात ०५.२० वाजेपर्यंत नियमित केली जाईल.
8. 12618 अप (हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम / मंगला एक्सप्रेस) भुसावळ विभागात ०५.२५ वाजेपर्यंत नियमित केली जाईल.
9. 12138 अप (फिरोजपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पंजाब मेल) भुसावळ विभागात ०५.३५ वाजेपर्यंत नियमित केली जाईल.10. 12290 अप (नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दुरांतो एक्स्प्रेस) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २५ ते ३० मिनिटे उशिराने पोहोचेल.