Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताय? थांबा... 'या' वेळेत विशेष ब्लॉक

Pune Mumbai Express Highway Special block: पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलै रोजी पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. 27 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहे.

Updated: Jul 26, 2023, 07:00 PM IST
Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताय? थांबा... 'या' वेळेत विशेष ब्लॉक title=
une Mumbai Express Highway

Mumbai Pune Expressway News : महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांना मार्ग म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळत असल्याची माहिती समोर यते आहेत. त्यामुळे लोणावळा आणि इतर आजूबाजूच्या परिसरात प्रवास करताना संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलै रोजी पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. 27 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहे. या वेळेत हलकी वाहतूक मॅजिक पॉईंट पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. तर अवजड वाहतूक किवळे पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरूच राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

काल पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याच्या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवरील तिन्ही मार्गिका ठप्प झाल्या होत्या. रात्री सव्वा सहाच्या सुमारास लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचं काम सुरु असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता दरड हलवल्या जाणार येणार आहे.

आणखी वाचा - Maharashtra Rain Live Updates : कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. हवामान खात्याकडून आत राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.  रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा आणि कोल्हापूर तर गडचिरोलीत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे आता घाटमाथ्यावर मोठ्य़ा प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रवास टाळवा, असा सल्ला देण्यात येत आहे.