अंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड

सध्या सगलीकडेच सरकारी कामांसाठी तसेच इतर अनेक कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य झालेय. आधारकार्डला इतके महत्त्व असतानाही अंबरनाथमध्ये आधारकार्ड कचऱ्यामध्ये फेकल्याची घटना समोर आलीये.

Updated: Jul 15, 2017, 04:04 PM IST
अंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड title=

अंबरनाथ : सध्या सगलीकडेच सरकारी कामांसाठी तसेच इतर अनेक कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य झालेय. आधारकार्डला इतके महत्त्व असतानाही अंबरनाथमध्ये आधारकार्ड कचऱ्यामध्ये फेकल्याची घटना समोर आलीये.

शहराच्या पश्चिम विभागातील रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्वामीनगर झोपडपट्टीत ही घटना घडली. या ठिकाणी असलेल्या सर्वयोगी सेवा संस्थेचे पदाधिकारी जगदीश गोविंदन आणि अँथनी नायडू यांना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास २६ आधारकार्ड एका दुकानासमोरच्या उकिरड्यावर पडलेली दिसली. 

त्यानंतर गोविंदन आणि एड्नेल नायडू यांनी हि सापडलेली आधारकार्ड संबंधित व्यक्तींकडे पोहोचवण्याचे ठरवले. आधारकार्डवरील मोबाईल नंबरच्या सहाय्याने ओळख पटवून त्यांनी ही आधारकार्डे संबंधित व्यक्तींकडे सुपूर्द केला. 

दरम्यान, टपाल खात्याकडे वाटपासाठी आलेली आधारकार्ड सारखे महत्वाचे दस्तावेज अशी उकिरड्यावर कशी टाकण्यात आली असा सवाल उपस्थित होतोय.