पुणे : पंढरपूर ते आळंदीला जाणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पायी दिंडीला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचे निधन झाले. या अपघात एकूण २ जण मृत्यूमुखी पडले तर पाचजण जखमी झाले आहेत. दिवेघाटात पालखी असताना मागून आलेला जेसीबी पालखीत घुसल्याने हा अपघात झाला. आळंदीला निघालेल्या या दिंडीत पुण्यासहीत राज्यभरातील साधारण २ हजार वारकरी सहभागी होते.
मृतांची नावे
१)अतुल आळशी
२)सोपान तुलसीदास रामदास
जखमींची नावे
१)विष्णू सोपान हळवाल.
२)शुभम नंदकिशोर आवरे
३)दीपक अशोक लासुरे
४)गजानन संतोष मानकर
५)वैभव लक्ष्मण बराटे
६)अभय अमृत मोकम्फले
७)किर्तीमन प्रकाश गिरजे
८)आकाश माणिकराव भाटे
९)ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम
१०)गरोबा जागडे
११)विनोद लहासे
१२)नामदेव सागर
१३)सोपान महासाळकर
१४)गजानन सुरेश मानकर
१५)सोपान मासळीकर
पुण्यातील दिवे घाटात वारकरी दिंडीत झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले असून यातील दोन जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर आहे. मृतांमध्ये नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज यांचा समावेश आहे. दिवे घाटात जेसीबीचे ब्रेक फेल झाल्यानं जेसीबी वारकरी दिंडीत घुसला आणि हा अपघात घडला. नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना हा अपघात घटला. जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
काल रात्री त्यांनी सासवडमध्ये मुक्काम केला. सासवडहून पहाटे चार वाजता दिंडी सुरु केली. घाट सुरु होताना नाश्ता करण्यासाठी मुक्काम केला. तेव्हा एका जेसीबीने दुचाकीला उडवले. त्या जेसीबीचे ब्रेक निकामी झाले होते. दिंडी सुरु असताना तू रस्त्याने जेसीबी चालवू नको अशी विनंती दिंडीकरांनी जेसीबीच्या चालकाला केली होती. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केल्याने हा भीषण अपघात झाला.