पंढरपुरमध्ये आषाढीचा सोहळा २३ जुलैला, भाविकांची लगबग

पालखी सोहळा काळात पुणे-सातारा आणि सोलापूर या जिल्हयातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नेमणूक 

Updated: May 31, 2018, 05:56 PM IST
पंढरपुरमध्ये आषाढीचा सोहळा २३ जुलैला, भाविकांची लगबग title=

पंढरपूर : आषाढी यात्रेचा सोहळा पंढरपूरमध्ये २३ जुलैला साजरा होणार आहे.  पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. आषाढीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रस्थान होईल. पुणे-पंढरपूर या दरम्यान पालखी सोहळा काळात पुणे-सातारा आणि सोलापूर या जिल्हयातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली जाईल. पुणे विभागीय महसूल आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दोन्ही पालखी मार्गाची आणि पालखी तळाची पाहणी केली.

कामांची पाहणी  

आज पंढरपूरात सुरू असणारी रस्त्याची कामं आणि घाटाची कामं आणि भक्त निवास मंदीर परिसरातील कामं यांची पाहणी करून सदर कामं पालखी प्रस्थानपूर्वी  पूर्ण करण्याच्या सूचना संबधित विभागाना  दिल्या आहेत.