close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उद्धव ठाकरेंनी माझे फोन उचलले नाहीत- देवेंद्र फडणवीस

 राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Updated: Nov 8, 2019, 05:04 PM IST
उद्धव ठाकरेंनी माझे फोन उचलले नाहीत- देवेंद्र फडणवीस

मुंबई : माझ्यासमोर अडीच वर्षांचा विषय कधी झाला नव्हता. एकदा एक बोलणी फिस्कटली होती असे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  दिवाळीत मी अनौपचारीक बोलणी झाली त्यात मी स्पष्ट म्हटले की माझ्यासमोर कधीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचे बोलणे झाले नाही. कदाचित ती गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झाली असेल असेही ते म्हणाले. पण जे काही मतभेद झाले ते आपापसातील चर्चेतून सोडवता आले असते पण तसे झाले नाही असेही ते म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला. 

उद्धव ठाकरे यांचे आणि माझे वैयक्तिक खूप चांगले संबंध आहेत. आणि ते यापुढेही राहतील. पण मी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले पण त्यांनी ते उचलले नाहीत. त्यामुळे चर्चा आमच्याकडून थांबली नाही तर ते शिवसेनेकडून थांबल्याचे ते म्हणाले. 

आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करायला शिवसेनेला वेळ होता. पण ज्यांच्याविरोधात मतं मागितली त्यांच्याशी वारंवार भेटी होत होत्या. आम्ही सातत्याने संवाद केला. पण ते बंद करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करण्याचे शिवसेनेचे धोरण योग्य नसल्याचे ते यावेळी म्हणाले.