यशवंत जाधव यांच्या डायरीतल्या 'मातोश्री'बद्दल आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया..

यशवंत जाधव यांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद आहे. त्यांच्या डायरीतील त्या मातोश्री नेमक्या कोण? यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीय.  

Updated: Mar 29, 2022, 12:27 PM IST
यशवंत जाधव यांच्या डायरीतल्या 'मातोश्री'बद्दल आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया..  title=

सिंधुदुर्ग :  मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. यावेळी आयकर विभागाने त्यांच्या घरातून लॅपटॉप, स्कॅनर, दोन कोटी रोख आणि काही वस्तू ताब्यात घेतल्या.

या वस्तूंमध्ये एका डायरीचा समावेश होता. याच डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची सापडली अशी माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली. यावरुन डायरीतील त्या मातोश्री नेमक्या कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. 

यावरून आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीय. सिंधुदुर्ग येथे दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यशवंत जाधव यांच्या त्या डायरीतील 'मातोश्री' बद्दल मोठं भाष्य केलंय.

'अफवांवर किती आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं याच्या मर्यादा आहेत.' आताच्या काळात किती अफवा पसरवल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून काहीही ते काहीही करू शकतात.

जिथे भाजप सरकार नाही. त्या राज्यात खूप गैरप्रकार सुरु आहे. सोबतीला यंत्रणा तर आहेतच. अफवांच्या बातम्या पाठवल्या जातात. पण, मी त्यात जाणार नाही. त्यातून अधिकृत गोष्टी समोर येतील. पण, बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही, असे ते म्हणाले.