आदित्य ठाकरे कडाडलेत, या भूमीने अनेक वार पाहिलेत?

Aditya Thackeray's visit to Raigad : रायगड दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.  

Updated: Mar 31, 2022, 02:48 PM IST
आदित्य ठाकरे कडाडलेत, या भूमीने अनेक वार पाहिलेत? title=

अलिबाग : Aditya Thackeray's visit to Raigad : रायगड दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. प्रेमाने आलात तर बाजुला बसवू पण तलवार घेऊन वार करायला आलात तर या भूमीने अनेक वार पाहिलेत असं ते म्हणाले. विरोधकांनी बदनामीचं षडयंत्र सुरू ठेवलंय. कुणीही चालून आलं तरी महाराष्ट्र वाकणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही ही शपथ घेवून आम्ही पुढे निघालोय असंही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या तीन दिवसांच्‍या कोकण दौऱ्याची सांगता माणगाव मेळाव्‍याने झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीचे चांगले काम सुरू असताना विरोधकांनी बदनामीचं षडयंत्र सुरू ठेवलं आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

ही आघाडी लेच्‍यापेच्‍याची नाही. कुणीही चालून आलं तरी महाराष्‍ट्र वाकणार नाही, महाराष्‍ट्र झुकणार नाही ही शपथ घेवून आम्‍ही पुढे निघालो आहोत, असंही ते म्‍हणाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, परीवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्‍या माजी महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.