कोल्हापूरचा नादखुळा, मटण दरवाढीवर निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय समिती

 कोल्हापुरातल्या मटण दरावर तोडगा काढण्यासाठी अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आहे. 

Updated: Dec 3, 2019, 08:41 AM IST
कोल्हापूरचा नादखुळा, मटण दरवाढीवर निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय समिती title=

कोल्हापूर : कोल्हापुरातल्या मटण दरावर तोडगा काढण्यासाठी अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आहे. कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने ७ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे. कोल्हापूरात गेल्याकाही दिवसांपासून मटणाचे दर वाढले आहे. त्यामुळे मटन थेट नदी पलीकडून आणण्याचा बोर्ड झळकावला... आणि संघर्षाला सुरूवात झाली.

परंतु कोणतेही हिंसक आंदोलक न करता बावडेकरांनी मटणाचे दर कमी केले आहेत. मटण म्हणजे कोल्हापूरकरांचा आवडता पदार्थ. तोच महाग झाल्यामुळे कोल्हापूरकर हैरान झाले होते. काही कोल्हापूकरांनी बोर्ड लावून तर काहींनी कमी दरात मटण विक्री सुरू केली. 

सुरूवातीचा मटण विक्रेत्यांकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आहे. पण कोल्हापूकरांनी एकदा ठरवलं तर ते मिळेपर्यंत शातं बसतील ते कोल्हापूरकर कसले. अखेर विक्रेते आणि ग्रामस्तांनी मिळून तोडगा काढला आणि मटणाचे दर कमी केले. त्यामुळे आता बावडेकरांच्या आंदोलनाला यश मिळाले.

बावड्यानंतर आता शहर आणि जिल्हा मटण विक्रेत्यांकडून दर कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी मान्य झाली नाही, तर मात्र 'आमचं ठरलंय मटण बावड्यातूनच आणायचंय' असे बोर्ड दिसले, तर आश्चर्य वाटायला नको.