Sharad Pawar : ... तर शरद पवार पंतप्रधान होतील; गोपीचंद पडळकर यांची टीका

Maharashtra Politics :  शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या देशात तीन राज्यांची नव्याने निर्मिती करावी लागेल. लवासा, मगरपट्टा आणि बारामती एकत्र करुन देश केला, तर त्याचे पंतप्रधान शरद पवार होतील, अशी खोचक टीका पडाळकर यांनी केली आहे. 

Updated: Mar 27, 2023, 03:05 PM IST
Sharad Pawar :  ... तर शरद पवार पंतप्रधान होतील;  गोपीचंद पडळकर यांची टीका title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी चर्चेत आले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar) यांनी पंतप्रधान पदावरुन शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पडाळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे पडाळकर आणि मिटकरी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगणार आहे.   

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या देशात तीन राज्यांची नव्याने निर्मिती करावी लागेल. लवासा, मगरपट्टा आणि बारामती एकत्र करुन देश केला, तर त्याचे पंतप्रधान शरद पवार होतील, अशी खोचक टीका पडाळकर यांनी केली आहे. 

अमोल मिटकरी यांचा पलटवार 

गोपीचंद पडाळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा अमोल मिटकरींनी जोरदार समाचार घेतला आहे. मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांची तुलना थेट चुलीवरच्या बाबाशी केली आहे. मिटकरी यांनी यांनी पडाळकर यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर केला.  

भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसतात. टीका करत असताना पवार कुटुंब त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पहायला मिळतं. रविवारी पुन्हा एकदा पडळकरांनी पवार कुटुंबावर टीका केली. त्यावर आता अमोल मिटकरी चांगलेच संतापले आहेत.अमोल मिटकरींनी गोपीचंद पडळकरांती तुलना थेट चुलीवरच्या बाबासोबत केली आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून पडाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

 

रामदास आठवले यांचे शरद पवारांना एनडीएमध्ये यायचं निमंत्रण

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना एनडीएमध्ये यायचं निमंत्रण दिले आहे. शरद पवारांनी विरोधकांची बैठक घेऊन काही साध्य होणार नाहीये, पवारांनी एनडीएमध्ये आलं पाहिजे, असा सल्ला आठवलेंनी पवारांना दिला आहे.