'उद्धव साहेबांचं काय चुकलं'? खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन

कोल्हापुरात उद्धव ठाकरे समर्थकांनी आंदोलन केलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते.

Updated: Jul 25, 2022, 01:27 PM IST
'उद्धव साहेबांचं काय चुकलं'? खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन title=

मुंबई : कोल्हापुरात उद्धव ठाकरे समर्थकांनी आंदोलन केलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. 'उद्धव साहेबांचं काय चुकलं'? असा जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक मानेंच्या घराकडे निघाले होते

खासदार धैर्यशील माने शिवसेनेच्या शिंदे गटात सामिल झाल्याने आज कोल्हापूरातील उद्धव ठाकरे समर्थकांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले. आंदोलनकर्ते यावेळी उद्धव साहेबांचं काय चुकलं? असा जाब विचारत होते. 

दरम्यान यावेळी पोलिसांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनकर्त्यांना माने यांच्या घराकडे जाण्यापासून पोलिसांनी अडवले. काही आंदोलनकर्त्यांना तात्पूर्ते ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची सुटका करण्यात आली.