काँग्रेसकडून शिवसेनेला ८ दिवस थांबण्याचा सल्ला

एका बाजुला सत्तास्थापनेसाठी बैठकांची सत्र सुरू

Updated: Nov 13, 2019, 03:45 PM IST
काँग्रेसकडून शिवसेनेला ८ दिवस थांबण्याचा सल्ला  title=

मुंबई : एका बाजुला सत्तास्थापनेसाठी बैठकांची सत्र सुरू झालं असलं तरी आठ दिवस थांबा असं काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र काळजी करण्याचं कोणतंही कारण नसून शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. काल रात्री वांद्रेतल्या एका हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात चर्चा झाली. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आधी चर्चा करून दोघांचा किमान समान कार्यक्रम तयार करतील. त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करून अंतिम किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. एकदा किमान समान कार्यक्रम ठरला की तिन्ही पक्ष सत्तास्थापनेच्या दिशेनं पावलं टाकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक संपली आहे. वांद्रेमधील हॉटेल ट्रायडंटमध्ये ही पहिली बैठक झाली. दीडतासापासून काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. या चर्चेतून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, 'चर्चेला सुरूवात झाली आहे, चर्चा योग्य दिशेने जात आहे. तसेच चर्चा अंतिम टप्प्यात येईल, आणि जे काही अखेर ठरणार आहे, ते तुमच्यासमोरही येणार आहे'.