Ahmednagar News: अहमदनगरच्या अकोले तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. अकोले तालुक्यातील बेलापूर गावात दिरानेच त्याच्या दोन भावजयींचा म्हणजेच वहिनींचा खून केला आहे. हत्येनंतर दीर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. आरोपीचे नाव दत्तात्रय प्रकाश फापाळे असं असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसंच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. आरोपी माथेफिरू असल्याची माहिती समोर येत आहे.
अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने दोन भावजयांचा निर्घृण खून केला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या हा हत्येचा थरार घडला आहे. दोन्ही महिलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. धारदार कोयत्याच्या सहाय्याने दिराने दोन्ही वहिनींवर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे अशी दोन्ही मृत महिलांची नावे आहे. भरवस्तीत खुनाचा थरार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीची आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्या डोळ्यांसमोरच ही घटना घडली असून तिनेच पोलिसांनी घडलेला प्रकार सांगितला. पोलिस आरोपीचा शोध घेत असून अकोले पोलीस तपास करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोकसून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आल्याची घटना पिंपरी-चिंचवड येथे घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोकसून हत्या केल्याचं स्पष्ट दिसतंय. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. अमीर मकबूल खान अस हत्या झालेल्या रिक्षा चालक तरुणाच नाव आहे. संशयित आरोपी हा फरार झाला आहे. ही घटना चिंचवडमध्ये घडली. काही मिनिटं दोघांमध्ये वाद झाला. त्रयस्थ व्यक्तीने तो सोडवण्याचा प्रयत्न ही केला. परंतु, आरोपीने अमीरच्या हृदयावर थेट स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला. हृदयात स्क्रू ड्रायव्हरने भोकसल्याने काही क्षणात अमीर जागीच कोसळल्याने सीसीटीव्हीत दिसत आहे. अज्ञात आरोपीचा शोध चिंचवड पोलीस घेतायत. अजून ही हत्येचे कारण समजू शकलं नाही.
ENG
587(151 ov)
|
VS |
IND
79/3(20.3 ov)
|
Full Scorecard → |
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.