बलात्कार केलेल्या आरोपीचा संतप्त जमावाच्या मारहाणीनंतर मृत्यू

बलात्कार केलेल्या आरोपीला संतप्त जमावाने जीवे मारण्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.  

Updated: Feb 6, 2020, 07:34 PM IST
बलात्कार केलेल्या आरोपीचा संतप्त जमावाच्या मारहाणीनंतर मृत्यू

नाशिक : बलात्कार केलेल्या आरोपीला संतप्त जमावाने जीवे मारण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अकोले तालुक्यात जायनेवाडी आदिवासी वाडीत हा प्रकार घडला. याप्रकरणी राजूर पोलिसांत अत्याचार आणि खून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. बेदम मारहाण करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे  

मंगळवारी दुपारी शिवारातील खारेबा माळावर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय महिलेवर राजू सोनवणेने (४५) यांने अत्याचार केले. बलात्कार करून आरोपी राजू जंगलात पळून गेला होता. मात्र पीडितेच्या नातेवाईकांनी त्याला शोधून गावात आणले आणि चार ते पाच तास गावातल्या एका बाकावर बांधून ठेवले. गावात येणाऱ्या प्रत्येकाने राजूला मारहाण केली. संध्याकाळी त्याला राजूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. उपचारासाठी नाशिकला नेताना त्याचा मृत्यू झाला.

महिलेवर बलात्कार करणारा आरोपी फरार होता. त्याला पकडल्यानंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. त्याचवेळी त्याला मारहाण करण्यात आली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला असताना त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवला होता. त्याच्या जबानीनंतर आरोपीला हवाली करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.