शिंदे-फडणवीस यांनी मदत करतोय सांगण्यापेक्षा ती कृतीत उतरवावी - अजित पवार

 Farmers loss due to floods in Vidarbha : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पूरग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज ते गडचिरोली आणि चंद्रपुरात नुकसानीची पाहणी करतील.  

Updated: Jul 28, 2022, 07:51 AM IST
शिंदे-फडणवीस यांनी मदत करतोय सांगण्यापेक्षा ती कृतीत उतरवावी - अजित पवार title=

गडचिरोली : Farmers loss due to floods in Vidarbha : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पूरग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज ते गडचिरोली आणि चंद्रपुरात नुकसानीची पाहणी करतील. दरम्यान, त्यांनी दोन मंत्र्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. पूरग्रस्तांना मदत नाही, शेतकरी संकटात आहे. फक्त दोघांना राज्य चालवणं शक्य नाही, असं सांगत  हम दो आणि बाकी कुणी नाही असा सध्याचा कारभार आहे, अशी खरमरीत टीका केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मदत करतोय सांगण्यापेक्षा ती कृतीत उतरवावी, असे आवाहनही केले.

दिवसभर सह्या केल्या, तरी फायली संपणार नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही नुकसानभरपाई मिळालेली नाही. पावसामुळे जवळपास 10 लाख हेक्टर जमीनचे विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करतोय सांगण्यापेक्षा ती कृतीत उतरवावी, असे अजित पवार म्हणाले.

आज अजित पवार यांचा गडचिरोली दौरा सुरु झाला आहे. अजितदादा म्हणाले, मला सांगण्यात आलं की विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धरणाच्या बॅक वॉटरमुळे रस्ते बंद झाले, शेतकऱ्यांचा शेतामध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी सांगीतले म्हणूण विश्वास न ठेवता मी स्वतः पाहिल्यावर सगळी परिस्थीत जाणून घेणार आहे. आणि नंतर सगळे विरोधक बसून सभागृहात प्रश्न मांडणार आहोत, असे ते म्हणाले.

राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न चिंतेचा विषय झाला आहे. आता पूरग्रस्त भागात मदत मिळाली नाही तर शेतकरी टोकाचे पाऊल उचलतील, अशी भीती आहे. त्यामुळे तात्काळ मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना सरळ मदत करावी, अशी मागणी अजिदादांनी केली आहे.