अजित पवार यांचा राज ठाकरेंना जोरदार टोला, कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल?

 Ajit Pawar On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Updated: May 3, 2022, 11:38 AM IST
अजित पवार यांचा राज ठाकरेंना जोरदार टोला, कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल?  title=

मुंबई : Ajit Pawar On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवार यांचे काम आहे. नकला करुन पोट भरत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. लोकांची माथी भडकावू नका असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे. (Ajit Pawar strongly criticized On Raj Thackeray)

उचलंली जीभ लावली टाळ्याला. अरे... माणसांचे संसार उभे करायला डोकं लागतं. अक्कल लागते. धुडगूस आणि तोडमोड करायला अक्कल लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या श्वासात आहेत. हृदयात आहेत. ध्यासात आहेत, आमच्या नसानसात आहेत. कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल? त्यांना महाराज समजलेच नाहीत. यापुढे असेच वागले तर त्यांना कधीच समाजणार नाही. केवळ दुकानदारी चालविण्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी समाचार घेतला.

ही सगळी नौटंकी आहे. याची नक्कल कर, पवारसाहेबांची कर, भुजबळांची नक्कल कर तर कधी माझी नक्कल कर, जयंत पाटलांची नक्कल कर. यायला, नक्कलाकार आहेत की भाषण करायला आले आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.

पाहुयात काय म्हणालेत अजित पवार