अजित पवारांच्या सौ. सिनेट निवडणुकीत बिनविरोध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटमधल्या पदवीधर आणि व्यवस्थापन गटाची निवडणूक होत आहे. 

Updated: Nov 19, 2017, 10:13 AM IST
अजित पवारांच्या सौ. सिनेट निवडणुकीत बिनविरोध title=

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटमधल्या पदवीधर आणि व्यवस्थापन गटाची निवडणूक होत आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची झालेली बिनविरोध निवड आणि मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधू प्रसेनजित फडणवीस यांनी एकता पॅनेलद्वारे निवडणुकीत घेतलेली उडी, यामुळे यंदाची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. 

6 जागांसाठी एकूण 44 उमेदवार

या निवडणुकीसीठी पदवीधर गटातल्या 10 तर व्यवस्थापन गटातल्या 6 जागांसाठी एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. 

सकाळी 10 वाजता मतदान

मतदारांना  पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रांवरील 113 बुथवर मतदान करता येणार आज सकाळी 10 वाजता मतदानाला सुरवात होईल. व्यवस्थापन गटासाठी २२८, तर पदवीधर गटासाठी ४९ हजार ७६१ मतदार मतदान करतील. तर 27 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.