मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कार्यभार हाती घेतला. केंद्राचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुढील पाच वर्षांत २०२४ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था USD 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले असल्याचे सांगितले होते.
मात्र, त्यानंतर देशात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने देशासह, राज्याचीही अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती. भारताचा GDP सध्या अंदाजे USD 2.8 ट्रिलियन इतका आहे. तर, USD 5 ट्रिलियन डॉलर्स हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारताला 9 टक्के दराने वाढ करावी लागणार आहे.
मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना कोविडमुळे मंदावलेला राज्याचा आर्थिक विकास अधिक गतिमान करण्यासाठी "विकासाची पंचसूत्री" हा विशेष कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली.
या कायर्कर्मासाठी येत्या तीन वर्षात सरकार सुमारे ४ लाख कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत भरीव गुंतवणूक होईल. महाराष्ट्र हे देशातील १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
पंत्रप्रधान नरेंद मोदी यांनी २०२४ पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत देशाची अर्थव्यवस्था नेण्याचे तर अर्थमंत्री अजित पवार यांनीही २०२४ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर इतकी नेण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना आव्हान दिल्याची चर्चा विधानभवनात होती.