आता ना तो 'पीएसआय', ना ते 'पोलीस', फक्त 'आरोपी'

 पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावं आहेत. 

Updated: Nov 18, 2017, 11:02 AM IST
आता ना तो 'पीएसआय', ना ते 'पोलीस', फक्त 'आरोपी'

सांगली : अनिकेत कोथळेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावं आहेत. 

अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर

कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली. या कारवाईचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला आहे. 

युवराज कामटे याच्यावर बडतर्फीची कारवाई

पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यावर बडतर्फीची कारवाई पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केली. 

हत्येच्या निषेधार्थ मिरज शहर बंदची हाक

तर लाड, टोणे, शिंगटे आणि मुल्ला यांना बडतर्फ करण्याचे अधिकार जिल्हा पोलिस प्रमुखांना असल्यानं नांगरे-पाटील यांनी पोलिसप्रमुख शिंदे यांना बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, अनिकेत कोथळेचा खून करणा-यांच्या निषेधार्थ मिरज शहर बंदची हाक देण्यात आली आहे.