आणखी एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण 

Updated: Sep 19, 2020, 06:12 PM IST
आणखी एका राज्यमंत्र्याला कोरोनाची लागण  title=

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पत्नी नयना कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  

मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत आहे. अनेक कार्यक्रमाला देखील बच्चू कडू यांनी हजेरी लावली होती. अशातच बच्चू कडूंना थोडा अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी आपली कोरूना चाचणी करून घेतली.

त्यामुळे बच्चू कडू हे अकोला किंवा अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे सध्या अचलपूर वरून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले असून पुढील उपचारासाठी कुठल्या शासकीय रुग्णालयात दाखल होतात हे अजून गुलदस्त्यात आहे.

फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अमेरिकेतुन आमदार आणावे लागतील' | Bachhu  Kadu Political Attacked on CM Devendra Fadnvis

कोरोना लॉकडाऊन काळातही ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत होते. दरम्यान कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांनी चाचणी केली होती. त्याचा अहवाल नुकताच आला. त्यात ते कोरोना पॉझिटीव्ह आढळले.

अमरावती जिल्ह्यातील महावितरण मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे ३५० कंत्राटी कामगारांचे जवळपास ५० लाख रुपये थकवले होते व अनेक कामगारांचे हजारो रुपयांचे डिपॉझिट जमा सुद्धा केले होते. बच्चू कडू यांनी याचा पाठपुरावा केला होता. कामगारांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर आता या कामगारांचे ५० लाख रुपये परत केले गेल्याचे ट्वीट त्यांनी नुकतेच केले होते.

पेंच व कन्हान नदीच्या पुरामुळे नुकसान ग्रस्त झालेल्या गावांचा पाहणी दौरा त्यांनी केला होता. नुकसान झालेल्या शेतकरी आण नागरिकांची भेट घेऊन त्यांना योग्य ती मदत शासनाचे वतीने देणयाचे आश्वासन त्यांनी दिले.. सानुग्रह अनुदान तात्काळ देण्यात येणार अन्नधान्य सुध्दा पुरविण्याचे प्रशासनास निर्देश त्यांनी दिलेत.