राज्यात कोरोनाची चौथी लाट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला हा सल्ला

 ​Amid Covid-19 fourth wave in Maharashtra : राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Jun 14, 2022, 12:41 PM IST
राज्यात कोरोनाची चौथी लाट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला हा सल्ला title=

मुंबई / जालना : Amid Covid-19 fourth wave in Maharashtra : राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाची चौथी लाट आली असली तरी काळजी करण्याचं काही कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितले.

राज्यात कोरोनाचे 1 हजार 885 नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 1 हजार 118 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी राज्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर मुंबईत नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण, 2 लहान मुलींचाही समावेश आहे. मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडलेत. बी.ए. 5 चे तीन आणि बी ए.5 व्हेरीयंटचा एक रुग्ण सापडला आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत कोरोनाचे स्वॅब तपासल्यानंतर नव्या व्हेरियंटचे रुग्ण असल्याचं समोर आलं. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, नागरिकांनी मास्क वापरवा आणि लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. नागरीकांना बूस्टर डोस मोफत देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं. बूस्टर डोस देण्यासाठी हर घर दस्तक मोहीम राबवणार असल्याचे ते म्हणाले.